नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत ९ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री नामदेव चव्हाण ( अप्पर पोलीस उपायुक्त, पुणे शहर) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात अमर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून थोर आदिवासी समाज सुधारक बिरसा मुंडा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर अप्पर पोलिस उपायुक्त श्री. नामदेव चव्हाण यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. जीवनामध्ये यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटी आवश्यक आहे. आपल्या शालेय व महाविदयालयीन जीवनातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. पोलिस आणि समाज यांचे अतूट नाते आहे याचीही जाणीव त्यांनी करून दिली. या कार्यक्रमासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन पवार , अभियंता, श्री. अनंत खंडागळे हे ही उपस्थित होते.
विशेष म्हणजे सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. याचे सर्व मान्यवरांना अधिक कुतूहल वाटले. या कार्यक्रमाप्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक पायगुडे, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा.नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य श्री. अमर क्षीरसागर, लोकसेवा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शोफिमोन सर 10 T स्कूलचे प्राचार्य श्री.
डेनसिंग सर, लोकसेवा गर्ल्स स्कूलच्या प्राचार्या सौ. लक्ष्मी कुलकर्णी मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. अर्जुन शिंदे, श्री.राजेंद्र भोसले श्री.सुरेश पाटील, श्री. शंकर साळुंखे, श्री.भारत पवार श्री. दिनेश आत्राम श्री.सोमनाथ अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेश्मा मांढरे आणि कॅडेट तन्मय कांबळे यांनी केले.