बीड तालुक्यातील शेतकरी महिला मेळाव्याचे आयोजन सेन्ट अँन्स समाजसेवा केंद्र बहिरवाडी यांच्या वतीने भव्य महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून सेन्टेन्स सोशल सेंटर या संस्थेचा महिला शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
शेतक-यांनी कमी खर्चाची, बिनकर्जाची व शाश्वत शेती पध्दती नेमकी कशी करावी हे या कार्यक्रमात शिकवण्यात आलं व गेल्या कित्येक वर्षांपासून सेंट अन्स सोशलसेंटरच्या वतीने शेतकर्यांना जनजागृती करून शेतकर्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन केल जात.
जनतेने सेंद्रीय अन्नसेवनाचे महत्व समजून रसायनमुक्त अन्नाची मागणी केली पाहिजे. रासायनिक शेती करणे सोडल्यानंतर पहिल्याच वर्षी पूर्वीएवढे निव्वळ उत्पन्न मिळवता येते पण त्यासाठी पिकाचे आयुष्य, विविध कालावधीत लागणा-या मूलद्रव्याची गरज, कीड व रोग प्रादुर्भावाची वेळ इत्यादी बारकाईने अभ्यासून त्यावर वेळेवर सेंद्रीय पध्दतीचा वापर केला पाहिजे. बहुसंख्य शेतकरी रासायनिक खते व कीडनाशके वापरणे सोडतात व सेंद्रीय शेती करतो म्हणतात परंतु जेव्हा उत्पन्न कमी मिळते तेंव्हा सेंद्रीय शेतीला दोष देतात. अपुरा अभ्यास व मेहनतीची कमतरता या दोन गोष्टी या कार्यक्रमात सांगून शेतकऱ्यांसाठी उपयोगी अशी एक पुस्तिका म्हणजे रणरागिनी यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांकडून विविध सेंद्रिय शेती पिकांचे स्टॉल लावण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित महिला शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करत पिकाबद्दलची विचारपूस केली.या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राईट रेव्हरंड बिशप आंब्रोस रीबेल्लो औरंगाबाद धर्मप्रांताचे महागुरू यांची उपस्थिती होती बरोबरच सि.आशा जोर्ज सुपरियर सेन्ट अँन्स होम बीड यांची उपस्थिती होती. यावेळी नागरगोजे साहेब कृषी अधिकारी बीड, राजू गायके युवक जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बीड यांची उपस्थिती होती. येथे झालेल्या महिला शेतकरी मिळव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सिस्टर अॅड. अँनी जोसेफ संचालिका, सेन्ट अँन्स सोशल सेंटर बीड यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.