तळेगाव ढमढेरेत आढळला महिलेचा मृतदेह
ओळख पटवण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडुन आवाहन
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या तळेगाव ढमढेरे येथे एका महिलेचा मृतदेह आढळला असुन संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम शिक्रापूर पोलिसांकडून सुरू आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे गुरूवार (दि.२७) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रोड पासून 50 मीटर अंतरावरील भैरवनाथ मळ्यातील एका विहिरीत वरील फोटोतील अनोळखी महिलेचे प्रेत मिळून आले आहे.तिचे अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे.सदरची अनोळखी महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना खालील नंबर वर संपर्क साधुन शिक्रापूर पोलीसांना सहकार्य करावे.
संपर्क क्रमांक- 1) सपोनि रणजित पठारे मो नं.8369079611
सपोनि नितीन अतकरे मो नं-9822328378
पो नाईक खात्री मो नं -9922907044
पो कॉ अशोक केदार मो नं -9049949797