परभणी शहरातील जिंतूर रोडवरील जैन गार्डन रेस्टॉरंट येथे आज रविवारी (दि.11) कृषीभुषण कांतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. ज्या गावांना सुंदर स्वच्छ स्मशानभूमीची कामे सुरु आहेत आणि जी गावे याप्रकारे एक गाव एक स्मशानभूमीसाठी पुढाकार घेनार आहेत अशा गावातील नागरिकांना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर बैठकीस एकत्र बोलावण्यात आले होते. शासन स्तरावरील योजना आणण्यासाठी काय करावे लागेल, गावातील सर्वांचे सहकार्य कसे घ्यायचे, या अभियानाला लोकचळवळ म्हणून पुढे आणले पाहिजे यासांरख्या महत्वाच्या विषयांवर कृषीभुषण कांतराव देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यापुढे तालुका स्तरावर आणि प्रगतीपथावर असणाऱ्या स्मशानभूमीत बैठका घेवुन पुढील रणनीती आखली जाईल असे ते म्हणाले. या बैठकीस पुर्णा तालुक्यातून दिलीप शृंगारपुतळे , देवुळगाव दुधाटे येथून गोविंद दुधाटे , पालम तालुक्यातून संदिप गोळेगावकर , पुयणीचे समाधान गिनगिणे , गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथुन कृष्णा नारायण सूर्यवंशी , विठ्ठल मदन सूर्यवंशी , परभणी तालुक्यातील मिरखेल येथुन उमेश देशमुख, जिंतूर तालुक्यातून भोगाव देवीचे बालाजी देशमुख आणि लक्ष्मीकांत मोरे तर जिंतूर शहरातून बाळु बुधवंत, सेलु येथुन रोहीत क्षीरसागर , उपस्थित होते. तर परभणीतील डॉ.गोविंद कामटे ,कीर्तनकार नितीन सावंत , रामप्रसाद अंभुरे ,डॉ शंकर इंगळे , इंजि.गोपाळ जाधव , बालाजी चांदणे , प्रकाश गिरी , उंडेगावचे शामराव देशमुख , जोड परळीचे सोपान काळे ,संबरचे ओंकार चव्हाण , सूर्यकांत मोगल, शेख अझर , दिनकर गरुड , अमोल लांडगे, मधुकर नायक परभणीतून उपस्थित होते. कांतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काम वाढवण्याच्या संदर्भात बैठकीच्या समारोपात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.