औरंगाबाद : पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील फारोळा येथील अजित सिड्स प्रा.लि. चा गट नं. १०० मध्ये प्रोसेसिंग प्लॉट असुन सदर प्लांट मधील एकुन २०४२७ पाकीटाचे ताळेबंद पाहीले असता ५१७८ पाकीटा ऐवजी ४८३१ पाकीटेच शिल्लक असून ताळेबंदापैकी एकुन ३४७ सीड्सची पाकीटे कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रेकॉर्ड चेक केले असता कंपनीच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी देनंदिन हाताळत असलेले वेहीकल ईनचे रजिस्टर, सीड्स आउट वर्ड रजिस्टर चे पाने फाडुन टाकल्याचे निदर्शनास आले. अजीत सिड्स वाण / बियाणे पाकीटे गहु अजीत १०२ २० कि.ग्र.च्या ११९ व ४० कि.ग्र्.च्या १४८ पाकीटे ज्याची किंमत अदाजे रुपये ५,८४,६१०/- चा अफरातफर करुन कंपनीचा विश्वासघात त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन कंपनीचा अफारातफर झालेला माल परत मिळावा तसेच सदर प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करावी करीता लेखी फिर्याद दिली वरून पोलीस स्टेशन बिडकीन येथे गुरनं ४८८ / २०२२ कलम ४०८, ४०९, २०१ भादंवी प्रमाणे नोंद करण्यात आला. पोलीस अधिक्षक . मनिष कलवानिया याच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे तपासादरम्यान अजित सीड्स मधील काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विचारपूस करण्यात आली तसेच घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व कंपनीमध्ये असलेल्या सर्व रेकॉर्डची तपासणी केली. त्यावरून दिनांक १२ / १० / २०२२ रोजी रात्रीला एक पांढऱ्या रंगाची आयसर कंपनीचे गाडी कंपनीमध्ये इन इ आल्याची व आऊट झाल्याची रेकॉर्डला कोणतीही नोंद केल्याचे दिसून आले नाही त्यावरून सदर वाहनाबाबत सीसीटीव्ही फुटेज व घटनेवेळी कामावर असलेले सिक्युरीटी कर्मचारी, इतर कर्मचारी व हमाल यांना विचारपूस केली असता सदर वाहनांचा क्रमांक MH ०४ GR ७८८३ असल्याचे निष्पण झाले. त्यावरून सदरचे वाहनात बियाणे भरणारे हमाल तसेच कर्मचारी यांना विचारपूस केली असता त्यांनी कंपनीतील सुपरवायझर दत्ता लक्ष्मण घोरपडे रा. पिंप्रीराजा ता. जि. औरंगाबाद याने गाडी भरायला सांगीतल्याचे सांगीतले. त्यावरून दत्ता घोरपडे यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा माल त्याचे गावातील मित्र अख्तर गफ्फार शेख रा. पिंप्रीराजा याचे मदतीने आयसर मॉडल ३०१३ वाहन क्रमांक MH ०४ GR ७८८३ चे चालक अझहर खमरोद्दीन काझी व आदील फईम काझी दोन्ही रा. पिंप्रीराजा यांचेशी संगणमत करून स्वतःचे फायद्याकरीता सदरचे वाहन कंपनीमध्ये बोलावून कंपनीतील कर्मचारी व हमाल यांचेकडून वाहनात अजीत सिड्स वाण / बियाणे पाकीटे गहु अजीत १०२ २० कि.ग्र.च्या ११९ व ४० कि.ग्र.च्या १४८ पाकीटे ज्याची किंमत अदाजे रुपये ५,८४,६१०/- रू.चा माल भरून घेवून दत्ता घोरपडे याने गेट पास, बिल्टी (डी.सी) व इतर कागदपत्र तयार करून गेटवरील सेट्रला गेट पासून देवून सदरची मालासहीत गाडी चालक अझहर खमरोद्दीन काझी, अख्तर गफ्फार शेख व आदील फईम काझी यांनी घेवून पिंप्रीराजा येथे नेवून माल तेथेच ठेवला. त्यावरून सदर गुन्हयात आरोपी नामे १) दत्ता लक्ष्मण घोरपडे वय ३७ वर्ष रा. पिंप्री राजा ता. जि. औरंगाबाद. २) अख्तर गफ्फार शेख वय ३४ वर्ष रा. पिंप्रीराजा ता. जि. औरंगाबाद.३) आदिल फईम काजी वय १९ वर्ष रा. पिंप्रीराजा ता. जि. औरंगाबाद, ४) अजहर कमरोद्दीन काजी वय ३५ वर्ष रा.मु. रांजणी ता. घनसावंगी जि. जालना यांना गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचेकडून गुन्हयातील गेला सर्व मुद्देमाल ज्याची किंमत अदांजे रुपये ५,८४,६१० /- रू.चा माल व गुन्हयात वापरलेले आयसर मॉडल ३०१३ वाहन क्रमांक MH ०४ GR ७८८३ किं.अं. १०,००,०००/- असा एकुण १५,८४,६१० / रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कार्यवाही . पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण मनीष कलवानिया , यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी . विशाल नेहूल सपोनि श्री. संतोष माने सा., पोउपनि महेश घुगे, पोनॉ शरद पवार ब.नं. ११५० यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि महेश घुगे हे करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
दिल्ली में छात्रा को गोली मारने वाले आरोपी को Delhi Police ने किया गिरफ्तार
दक्षिणी दिल्ली के संगम विहार इलाके में 11वीं कक्षा की छात्रा को 25 अगस्त को गोली मारने के आरोपी...
Kolkata Rape-Murder Case: कोलकाता कांड के कितने किरदार, कहां तक पहुंची जांच? | Supreme Court
Kolkata Rape-Murder Case: कोलकाता कांड के कितने किरदार, कहां तक पहुंची जांच? | Supreme Court
BYD eMAX 7 की लॉन्च से पहले शुरू हुई बुकिंग, पहले एक हजार ग्राहकों को मिलेगा स्पेशल डिस्काउंट
BYD भारत में eMAX 7 को लॉन्च करने की तैयारी कर रही है। कंपनी इसे भारत में 8 अक्टूबर को लॉन्च करने...
અર્જૂન મોઢવાડીયાએ ભરતીમાં ભ્રષ્ટાચારનો આક્ષેપ લગાવ્યો
અર્જૂન મોઢવાડીયાએ ભરતીમાં ભ્રષ્ટાચારનો આક્ષેપ લગાવ્યો
JP Morgan On Maruti Suzuki | EV के Slowdown से किसे होगा फायदा? क्यों इस Stock पर बढ़ा भरोसा?
JP Morgan On Maruti Suzuki | EV के Slowdown से किसे होगा फायदा? क्यों इस Stock पर बढ़ा भरोसा?