विठ्ठलवाडी येथे चिमुकल्यांनी साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा आहे. यातुनच विठ्ठलवाडी येथील चिमुकल्यांनी मुरूड-जंजीरा किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील चिमुकल्यांनी हुबेहूब साकारलेला मुरूड-जंजीरा हा किल्ला रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात असून चहुबाजूंनी सागरी पाण्याने वेढलेला आहे. राजापुरी खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी असणारा मुरुड जंजिरा हा जलदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यातील अजिक्य किल्ला असून या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती पंधरा दिवसाच्या परिश्रमातून विठ्ठलवाडी या गावी चिमुकल्यांनी बनवली आहे. या किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी चैतन्य गवारी, मितांश गवारी, शौर्य गवारी, यश गवारी, हर्षवर्धन गवारी, शिवांश गवारी व सात्विक गवारी. तसेच जान्हवी गवारी, अन्विता गवारी आणि काव्या गवारी व निरंजन दरेकर यांनी किल्ला बांधणीसाठी तसेच अंतर्गत सजावटीसाठी मदत केली. हा किल्ला पाहण्यासाठी विठ्ठलवाडी व परिसरातील किल्ले शौकीन व ज्येष्ठ नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. हा किल्ला बनवण्यासाठी मार्गदर्शक प्राध्यापक संदीप गवारी तसेच संतोष गवारी नोटरी भारत सरकार यांनी सहकार्य केले.तसेच किल्ला पाहायला येणाऱ्या नागरिकांमधून या बालगोपालावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.हा किल्ला पाण्यासाठी तळेगाव ढमढेरे परिसरातील सर्व पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित होते. जंजिरा किल्ल्याची माहिती चैतन्य गवारी व अन्विता गवारी यांनी सांगितली.याप्रसंगी काही दुर्गप्रेमी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला व भेट देणाऱ्या किल्ल्या प्रेमी व्यक्तींना सीताफळीची रोपे वाटण्यात आली असल्याची माहिती गवारे कुटुंबीयांनी दिली.