रत्नागिरी : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश राणेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी न्यायालयाने त्यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध चाललेल्या एसीबी कारवाई विरुद्ध भास्कर जाधव यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी भाषणामध्ये भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश व नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्याचा आरोप करत भास्कर जाधव यांच्याविरोधात डेक्कन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात आमदार भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून हंगामी अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.