बीड प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बीड मंडळातील काही कार्यकर्त्यांनी स्वत: हा पद घोषित करून सोशल मिडीयामध्ये प्रसिद्धी दिल्याचे निदर्शनास आले आहे. हि बाब पक्ष संघटनेच्या दृष्टीने गंभीर व चुकीची आहे. अशा प्रकारे खोटी माहिती प्रसिध्द करून, कोणताही संभ्रम निर्माण करू नये. जेणेकरून पक्ष शिस्तीला गालबोट लागेल. असा मनमानी कारभार कोणीही करू नये. असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे. कि, भारतीय जनता युवा मोर्चाने परळी ता. वगळता इतर कोणत्याही मंडलात युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षांची निवड केलेली नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी निवडीचा प्रस्ताव लोकनेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ. प्रितमताई मुंडे व युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा. विक्रांत पाटील यांच्या कडे दाखल आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. याची सर्व भाजपा युवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी. व यापुढे खोट्या बातम्या प्रसारित करू नयेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. असे