शिरुर: दिवाळी सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गुनाट येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या शेकडो दिव्यांनी दत्त मंदिर परिसर उजळून निघाला होता.
श्री दत्त देवस्थान ट्रस्ट आणि गुनाट ग्रामस्थांच्यवतीने यंदा प्रथमच या अनोख्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिपोत्सवाचा हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी लक्ष्मीपूजनानिमित्त हजारो भाविकांनी दत्तगुरुंचे मनोभावे दर्शन घेतले. शेतकरी वर्गावर आलेले संकट दूर करुन सर्वांना सुखात, आनंदात ठेवा, अशी मनोकामना करत दत्त मंदिरात दीपोत्सव पार पडला.
यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता. यावेळी दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. “ दिव्यांच्या प्रकाशाने दत्तप्रभूंच्या साक्षीने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, सर्वांना सुखसमृद्धी प्राप्त व्हावी या हेतूने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते" असे दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. गणेश कर्पे यांनी सांगितले.
यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे, सरपंच संदेश करपे, पोलीस पाटील हनुमंत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बहिरट, सतीश सोनवणे, कृषी सहायक जयवंत भगत, भाऊसो गाडे गुरुजी, संस्कार ग्रुपचे अध्यक्ष मनोज गव्हाणे, श्यामकांत गोरडे, अंकुश करपे, संतोष करपे, वैभव करपे, आबा गाडे, अविनाश घावटे, संभाजी गाडे व दत्त भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.