लांजा : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच खरा इतिहास शिकविला गेला पाहिजे. आजही अभ्यासक्रमात शिवाजी महाराज, महात्मा फुले अशा अनेक देशभक्त, समाजसुधारकांचा संशोधनाअंती सिद्ध केलेला खरा इतिहास शिकवला जात नसल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मिनल कुठे यांनी व्यक्त केली.
हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट सोसायटी संचलित जावडे हायस्कूल, प्राथमिक आश्रमशाळेत आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कुष्टे यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धनावडे, प्रभाकर कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ग्रंथप्रदर्शनाच्या उपक्रमाचे डॉ. कुष्ठे यांनी कौतुक केले. विद्याथ्यांना आपलल्या जीवनातील पुस्तकांचे महत्त्व विशद करून दिले. चांगली पुस्तके चांगले संस्कार करीत असतात. जो चांगले वाचतो तोच आयुष्यात यशस्वी होतो असे मत डॉ. कुष्टे यांनी व्यक्त केले. पुस्तक आपले चांगले मित्र असते. आपले जीवन घडविण्यात पुस्तकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मत संतोष कांबळे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित तांबे यांनी केले. तर संगीता आखाडे यांनी आभार मानले.