शेगांव दि. २३

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

८४ हजार धम्म स्कंध तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले. त्या चवऱ्याऐंशी हजार धम्म स्कंधाचा सार म्हणजे आर्यअष्टांगीक मार्ग. आर्यअष्टांगीक मार्गातील सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत व सम्यक आजिवीका म्हणजे शील, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी म्हणजे समाधी होय. आर्यअष्टांगीक मार्गातील प्रज्ञा,शील व समाधी जेथे वास करते त्याला बुद्ध विहार म्हणतात अशा प्रकारे विहाराची व्याख्या भन्ते महास्थविर धम्मसेवक यांनी शेगांव येथील आम्रपाली बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर उपस्थितीतांना धम्म देसणा देतांना सांगितलेे .कार्यक्रमाची सुरूवात प्रथमतः पूज्य भन्ते विनयपाल महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकवून व उपस्थितीतांना शील देऊन झाली .त्यानंतर डाॅ सुजाता तायडे यांनी ग्रंथ वाचन केले.वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. राजकुमार सोनेकर,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा जळगांव संघटक एस एस शेगोकार,मोहन वाकोडे,नितीन गजभिये ,सुरेश गव्हांदे यांनी ह्यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रविंद्र शेगांवकर यांनी भूषविले होते.दि.२३ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे संचलन संघपाल समदुर व प्रास्ताविक हरीष अजने यांनी केले. ह्यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय इंगळे, नितीन शेगोकार, आकाश इंगळे, संजय भोसले, भारत मोहोळ, संजय साबळे, सतीष पहुरकर यांनी परीश्रम घेतले.