अहमदनगर :

 चैतन्य फाउंडेशन व सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचाने सावेडीच्या माऊली संकुल सभागृहात आयोजित केलेल्या "एक दिवाळी...पहाटवेळी" संगीत मैफिलीचे.प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे, सावनी रवींद्र व विभावरी आपटे-जोशी याकलावंतांच्या अनेकविध हिंदी-मराठी गाण्यांनी हा स्वर प्रभात संगीतोत्सव बहरला.अर्थातच रसिक नगरकरांनी टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात या मैफिलीला दाद दिली.

नगरकर संगीत रसिकांची दिवाळी सूरमयी करण्याच्या उद्देशाने मागील 2008पासून येथील चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई हे सावेडीज्येष्ठ नागरिक मंचाच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त संगीत मैफिलीचे आयोजन करतात.कोरोनामुळे मागील दोन वर्षे हा संगीतोत्सव झाला नाही.पण यंदा मागीलकसर भरून काढत ही संगीत मैफल कलावंतांनी बहारदार केली. घनश्याम सुंदरा,अवचिता परिमळू,तुझे गीत गाण्यासाठी,केव्हा तरी पहाटे, गोर्‍या गोर्‍या गालावरी,जीव रंगला दंगला,कधी तू रिमझीम बरसात यासारख्या अनेकविध मराठीगाण्यांसह ऐ जिंदगी गले लगाले, अभी ना जाओ छोडकर, लग जा गले,यारासिलीसिली अशा हिंदी गाण्यांच्या या मैफिलीची सांगता ने मजसी ने परत मातृभूमीला...या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेने झाली, तेव्हा नगरकर संगीत रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करीत कलावंतांना जोरदार दाद दिली. दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमासाठी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.माऊली सभागृह भरून गेले.नागरिकांची गर्दी पाहून आयोजकांनी ज्यादा खुर्चीची व्यवस्था केली. नगरकरांच्या प्रतिसादाला कलावंतांनीही साथ दिली. 

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांसह ज्येष्ठ संगीतकारसुधीर फडके,श्रीनिवास खळे,हृदयनाथ मंगेशकर,राम कदम, अजय-अतुल,श्रीधर फडके, अनिल-अरुण,अशोक पत्की, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली भावगीते, भक्तीगीते,चित्रपट गीते, लावण्यांसह अन्य अनेकविध गाण्यांच्या या मैफिलीत गायक कलावंतांना केदार परांजपे,दर्शना जोग,विशाल थेलकर,विक्रमभट व अभिजीत भदे यांनी वाद्यवृंद साथसंगत केली.विक्रम भट यांनी तबल्यावर ढोलकी वाजवून रसिकांची विशेष दाद मिळवली. तसेच पुल देशपांडे,मंगेश पाडगावकर,कुसूमाग्रज,बाबा आमटे आदींसह नामवंत कलावंतांचे किस्से सांगत मिलिंद कुलकर्णींचे बहारदार निवेदनही रसिकांच्या टाळ्या मिळवून गेले. प्रशांत उरुणकर,राजू ढोरे,सागर गंधारे आदींचे ध्वनी संयोजन मैफिलीची रंगत वाढवून गेले.

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत पाठक,कल्याणी फिरोदिया,दिलीप अकोलकर, राजेश देशपांडे,मुंबईचे प्राप्तिकर आयुक्त महेश जिवडे,वर्ध्याचे जिल्हाधिकारी श्री कर्डिले आदींच्या हस्ते कलावंतांचा गौरव करण्यात आला.चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांनी प्रास्ताविकात चैतन्य फाउंडेशनच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. प्रा.निनाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.या मैफिलीसाठी प्रा.मकरंद खेर,बलभीमपांडव, सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष आदिनाथ जोशी,ज्येष्ठ नेते ब्रिजलाल सारडा,कल्पेश अदवंत,अशोक जगताप,अमोल धोपावकर,आशितोष कुकडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नगरकरांनी कॉफीच्या आस्वाद घेतला.

 नगरमधील कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या कुंकुमार्चन चित्रपटाचेदिग्दर्शक अ‍ॅड.अभिजीत दळवी व पुष्कर तांबोळी,लॉकडाऊन काळात भटक्या कुत्र्यांना अन्न देऊन भूतदया जपणारी राधिका रणभोर तसेच योग योगेश्‍वर जयशंकर मालिकेत शंकर महाराजांच्या बालपणाची भूमिका करणारा आरुष बेडेकर यांनी नगरचा लौकिक वाढवल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव यावेळी चैतन्य फाउंडेशनद्वारे करण्यात आला.

संपादक - सुरेश तायडे

sureshtayde123@gmail.com