जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे पर्यटकांनी गर्दी पहावयास मिळाली.निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले व सप्तकुंडातील वाहनाने धबधबे पर्यटकांना आकर्षण करत आहे.मात्र रविवारी होणारी पर्यटकांची गर्दी व येथील कमी बससे मुळे पर्यटकांना त्रास सोसावा लागत आहे.सुटीच्या दिवशी बसेसची विशेष व्यवस्था करावी अशी मागणी पर्टकांसह येथील व्यवसायकांडुन केली जात आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येतात.लेणी सह परिसरातील नटलेले निसर्गाचे सौंदर्य व त्यातच सप्तकुंडातील ओसांडुन वाहनारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.मात्र शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची विशेष गर्दी पहावयास मिळते.टीपाॅइंट ते लेणी अशा धावणाऱ्या बससेची संख्या व कर्मचारी कमी पडत असल्याने पर्यटकांना नाहकचा वेळ लागत असुन सुटीच्या दिवशी विशेष बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांसह येथील व्यवसायकांकडुन केली जात आहे.