ग्रामीण भागात केरसुणी' अर्थात 'लक्ष्मी'ला आजही मागणी कायम

पाचोड (विजय चिडे) दिवाळीच्या दिवशीच फाडाफडीची लक्ष्मीपुजनाच्या मुख्य पूजेला खरेदी केली जाते. ती म्हणजे सिंधीच्या पानांपासून तयार होणारा फडा आणि केरसुनी. लक्ष्मीपूजनाला या झाडूला मोठा मान असतो. झाडूला लक्ष्मी समजले जाते.केरसुणी' अर्थात 'लक्ष्मी'ला आजही मागणी कायम असल्याचे पाचोड ता.पैठण येथील आठवडी बाजारात दिसून आले आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते.त्यामुळे या लक्ष्मीला विशेष महत्त्व आहे.

दिवाळी सण सर्वच जण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाचा गोडवा या आधुनिकी करणाच्या काळातही कायम आहे. अजूनही त्याच परंपरा सुरू आहेत.दिवाळी आली की खरेदीला सुरुवात होते. आधुनिक वस्तूंना महिला प्राधान्य देतात जसे की डिजाईन दिवे, शोभेच्या वस्तू, आकाश दिवे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यासोबतच आणखी एका गोष्टीची दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे.

सर्वच भागात आजही ही प्रथा कायम आहे.गतदिवाळीला केरसुणी विकणाऱ्यांना मोठा फटका बसला होता.मात्र यावर्षी कोरोना काहिअंशी कमी झाल्याने या लोकांना गावोगावी फिरुन व्यवसाय करता आला होता.त्यामुळे गेल्यावर्षीची दिवाळी अंधारात गेली होती. यंदा दिवाळीमध्ये निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र खरेदीसाठी गर्दी आहे. पूजनासाठी केरसुणीला आजही मोठे महत्व आहे. केरसुणीला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा असल्याने लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

चौकट-

यंदा सर्वच गणित बिघडले..

विशेष म्हणजे दिवाळीतील उलाढालीवर पुढील आर्थिक गणित अवलंबून असते. परंतु यंदा सर्वच गणित बिघडल्याने आर्थिक नियोजन कसे करणार आणि दिवाळी कशी साजरी करणार ? अशी खंत विठ्ठल सांवत रा. तांबी ता.शेवगाव येथील केरसूनी-झाडू (लक्ष्मी) उत्पादक मंडळीने केली.