कन्नड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नाचनवेल कोपरवेल कार्यालय यांच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगातून दिवाळीनिमित्त बाजारपट्टी गल्लीतील अनेक वर्षापासून रखडलेले बंदिस्त नालीचे कामाचा शुभारंभ कडूबाई सुरडकर सदस्य व आलिम शहा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संपूर्ण गावामध्ये दीपावली निमित्त नवीन पथदिवे, लाईट बसवण्यात आली. त्याचबरोबर सैनिक भवन कार्यालय येथे कंपाउंड भिंतीचे काम, शौचालय व स्नानगराचे काम चालू आहे, ग्रामपंचायत कार्यालय येथे नवीन खोल्या व गाळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून गावामध्ये विविध ठिकाणी असलेल्या कचऱ्याची साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. कोपरवेल गावातील नाल्यांचे दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसात सुरू होणार आहे अशी प्रतिक्रिया सरपंच प्रतिनिधी विठ्ठलराव थोरात यांनी दिली. त्यावेळी भूषण शिंदे, विठ्ठल थोरात सदस्य.शिवाजी थोरात, रवींद्र पिंपळे, भाऊसाहेब थोरात, भिवसन थोरात, पुंडलिक शिंदे, सुनील महाले ,स्वप्निल थोरात, ज्ञानेश्वर राऊत, कॉन्ट्रॅक्टर रामदास निकम, आधीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.