कासारी येथे शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा'चे वाटप

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

कासारी (ता.शिरूर) येथे राज्य सरकारच्या वतीने शिधापत्रिका धारकांना देण्यात आलेल्या दिवाळी सणासाठी 'आनंदाचा शिधा' किटचे वाटप करण्यात आले.

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या आनंदाच्या शिधांमध्ये रवा, पाम तेल, चणाडाळ, साखर आदी वस्तुंचा समावेश आहे. तर या किटच्या पुड्यावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, या किटला आनंदाचा शिधा हे नाव देण्यात आले आहे. यामुळे आता सर्व सामान्याची दिवाळी गोड होणार आहे. यावेळी कासारी गावच्या सरपंच सुनीताताई भुजबळ, उपसरपंच गोपाळ पंढरीनाथ भुजबळ, सुखदेव भुजबळ, गुलाब सातपुते, गोपीनाथ नरके व ग्रामस्थ उपस्थित होते.