रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स नं. एम एच 09 सी व्ही 2080 हि पहाटेच्या पाचच्या सुमारास उलटल्याने बसमधील 12 ते 14 प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पळुन गेला असुन याबाबत मंगलसिंग जसवंत सिंग ताजु (वय 30) सध्या रा. 201 स्मृती अपार्टमेंट, कदमवाडी कलिना, मुंबई मूळ रा.भूषण पार्क, गट नंबर 83, देवना लाईन रोड, औरंगाबाद यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पुणे-नगर महामार्गावर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी भरधाव वेगात असलेली हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स ड्रायव्हरच्या चुकीमुळे कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर उजव्या बाजूस पलटी झाली. यात 12 ते 14 प्रवासी किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले असुन यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानानंतर ट्रॅव्हल्स चालक मात्र पळुन गेला. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील पोलिस हवालदार संतोष पवार हे करत आहेत.