माजलगाव:-कोन कशी युक्ती लढवेल हे सांगता येत नाही ती अशी माजलगाव तालुक्यातील आडोळ येथुन एका व्यक्तीने माती उत्खनन व वाहतुकीचा परवाना घेतला खरा परंतु मातीचे उत्खनन करुन वाहतुक मात्र पाथरी तालुक्यात सुरु याकडे पाथरी पोलीसांचे व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दीसुन येत आहे.
सविस्तर बातमी अशी की माजलगाव तालुक्यातील सोमठाणा येथुन माती उत्खनन व वाहतुकीचा परवाना माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हान येथिल रहीवाशी असणारे सतीश पांडुरंग गोरे यांनी आडोळा येथिल गट क्रं ४ मधील शेतकरी वैजनाथ मारोती भालेराव यांच्या मालकीच्या १.२१ हे आर मधील कुंभार समाजाच्या पारंपारिक व्यवसायाच्या नावाखाली मागितली व माजलगाव च्या महसुल विभागने कुठलीही खातरजमा न करता परवानगी देवुन टाकली.त्याअनुसंघाने संबंधित परवाना धारकाने ५०० ब्रास मातीची परवानगी ही पारंपारिक व्यवसायाच्या नावाखाली घेवुन माती मात्र पाथरी तालुक्यातील विट भट्टीना पुरवत असुन याकडे माजलगाव तहसिलच्या तहसिलदार व संबंधित कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष की अर्थपुर्ण व्यवहारातुन हे उत्खनन व वाहतुक चालु आहे हे मात्र विचार करण्यासारखी बाब आहे.त्याच बरोबर माजलगाव तालुक्यातील आडोळा येथुन मतीचे उत्खनन व वाहतूक मात्र पाथरी तालुक्यात बिनधास्त क्षमतेपेक्षा जास्त हायवा भरुन जाताना दीसत आहेत याकडे पाथरी महसुल विभागाचे व पोलीसचे दुर्लक्ष का होत आहे हे मात्र विचार करण्यासारखे आहे या सर्व प्रकाराकडे वेळीच लक्ष देवून दोन्हीही तालुक्याचे तहसिलदार कार्यवाही करतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे.