दिव्यांगांना सानुग्रह अनुदान म्हणून पाच हजार रुपये द्यावे- नरसय्या आडम मास्तर ,माजी आमदार 

सोलापुर - नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थींच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान जमा करावे. तसेच चालू महिन्याचा उदरनिर्वाह भत्ताही या सानुग्रह अनुदानाबरोबर जमा करावा या मागणीसाठी दिव्यांग संघटना महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीही पालिकेने सानुग्रह अनुदान जमा केले नाही. त्यामुळे महापालिकेसमोर लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.