खेड: दिवाळी हा दीपोत्सव पूर्ण भारतभर साजरा केला जातो. परंपरेनुसार, दीपोत्सवास अनन्य साधारण महत्त्व सणासुदीच्या आहे. या काळात महावितरणकडुन सुरू असलेली थकबाकी वसुली मोहीम तूर्तास थांबवून वीज ग्राहकांचा पुरवठा खंडीत करू नये, या आशयाचे निवेदन काँग्रेसचे पर्यावरण जिल्हा अध्यक्ष किरण तायडे यांनी येथील महावितरणला सादर केले.

 या वर्षीचा दिवाळीचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर असा आहे. ऐन दिवाळीमध्ये थकीत वीज बिलाची वसुली आपले कार्यालयाकडून केली जात आहे. वसुली न झाल्यास वीज कनेक्शन स्तरावरून बंद केले जात आहे. किमान दिवाळीच्या कालावधीमध्ये तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील कनेक्शन तूर्तास बंद करणे थांबवावी, अशी मागणी केली.