रत्नागिरी : जिल्हावासीयांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त पद्धतीने साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्यांसह आजारी असलेल्यांना फटाके त्रास देऊ नये. फटाके न वाजवता म्हणजेच पैसे न जाळता वाचलेल्या खर्चातून अनेक मार्गाने दिवाळी साजरी करता येते. पर्यटनातून आनंद, गरजुंना आर्थिक मदत, विविध सामाजिक कामे करणे सहज शक्य आहे. इतरांच्या आनंदात सहभागी होतानाच त्यांनाही यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे. ध्वनी, हवा प्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजार पडणे आदी टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हाच एकमेव पर्याय आहे. या संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली असून जिल्हावासीयांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे.