खेड: मुंबई उच्च न्यायालयानं आज (शुक्रवार) मनसेचे नेते वैभव खेडेकर यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी खेडेकरांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते.  

गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोधात हाेते. गुरुवारी या प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांना पाेलिसांनी अटक केली.

या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयात वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयानं वैभव खेडेकर यांचा अटकपुर्वचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी वृत्तवाहिनीशी बाेलताना दिली आहे.