औरंगाबाद : केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ,उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांच्या अंमलबजावणीस गती देऊन सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे केले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सर्व केंद्र शासनाचा योजनाचा आढावा विभागनिहाय घेण्यात आला. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह सर्व विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित होते.प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजाणीस गती देऊन, सर्वसामान्यांना घर व हक्काचा निवारा उपल्बध करुन देण्यामध्ये महानगरपलिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने गती द्यावी. कामकाजात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारा कडून दंड वुसल करण्या बाबत महापालिका आयुक्ताना श्री. दानवे यांनी निर्देश दिले.

याबरोबरच प्रधानमंत्री कृषी सिंचान योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा आढावा घेतल्यानंतर कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,अश्या प्रकाराच्या प्रशिक्षण सत्र आणि अभ्यासक्रमाचा सुधारीत आराखडा तयार करण्याचे निर्देश कौशल्य व रोजगार विभागाला देण्यात आला.डॉ.भागवत कराड म्हणाले की, प्रधानमंत्री पिक विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड, त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन याविषयीचे लाभ बॅकांनी लाभर्थ्यांना तात्काळ वितरीत करावे असे निर्देश दिले. याबरोबरच डिजीटल इंडिया, बेटी बचाव बेटी पढाओ, राष्ट्रीय स्वास्थ मिशन या योजनेच्या बाबतीत उद्ष्टि पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले