संगमेश्वर : तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्र व पर राज्यात राजरोस व अवैधपणे गोवंश वाहतूक होत आहे. याबाबत वेळोवेळी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रारी करून हि कोणतीही कारवाई केली जात नाही. सदर प्रकाराबाबत तातडीने दखल घेऊन त्वरीत वाहतूक बंद करावी अन्यथा आम्हाला कायदा हातात घेवून ती रोखावी लागेल. असा इशारा माखजन परिसरातील नागरीकांनी दिला आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शासनाच्या नियमाप्रमाणे गोवंश बंदी असताना संगमेश्वर तालुक्यातून रात्री-अपरात्री गोवंश अवैधपणे व बेकायदेशीर वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असून संगमेश्वर तालुक्यात अनेकवेळा अशी होणारी वाहतूक अनेकवेळा अडविली होती. तरी देखील संगमेश्वर पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असून त्यावर कोणती ही कारवाई होत नाही, असे का? असा भेदभाव होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांना निवेदन व तक्रारी करून सुद्धा बंद होत नसल्याने निवेदनात नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातून होणारी अवैध गोवंश वाहतुक आम्ही अडवल्यास शांतता भंग होवून नाहक वाद निर्माण होवून वातावरण बिघडू शकते. असे होवू नये यासाठी अशी कत्तलीसाठी जाणारी अवैध गोवंश वाहतूक त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी माखजन ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षक यांना निवेदनाव्दारे केली आहे.

यावेळी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करताना शिवसेनेचे युवा पदाधिकारी स्वप्निल बापट, सचिन चव्हाण आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.