राजापूर : तालुक्यातील पडवे येथे वीज कोसळून घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एका मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील पडवे स्टॉप येथील गराटे यांच्या घरानजीक वीज कोसळली.
यामध्ये घरातील सर्व इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याचे सांगण्यात येत असून अंगणात काम करत असलेल्या दिव्या जनार्दन गराटे (17) वर्षीय तरुणीला किरकोळ दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला जवळील कोंबे स्टॉप येथील एका खाजगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले.
गराटे कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने याची तात्काळ दखल घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.