भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची प्रदेश कार्यकारिणी बैठक मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात संपन्न झाली

 दरम्यान यावेळी राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच संघटनात्मक आढावाही घेण्यात आला.विमुक्त भटका समाज हा राष्ट्रभक्त असून स्वातंत्र्य लढयात या समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी मी स्वतः तुमच्या बरोबर येईन असे मत भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांनी बोलताना व्यक्त केले.

भटके विमुक्त समाजाच्या वर्षाला 10 विद्यार्थी व 10 हजार शिष्यवृत्ती देण्यात येईल, 36 जिल्ह्यात वसतिगृह व्यवस्था, तसेच 50 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती देण्यात येईल.सरकार तांडा वस्ती सुधार योजनेसाठी 200 कोटींची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशिल आहे, तसेच भटक्या विमुक्त समाजाच्या जातीच्या दाखल्या संदर्भातच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन ओबीसी कल्याण मंत्री ना.अतुलजी सावे यांनी बोलताना सांगितले. तसेच प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर यांनी यावेळी संघटनात्मक आढावा घेत भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन केले. धन्यवाद मोदीजी उपक्रमात सहभागी होत लाभार्थ्यां मार्फत जास्तीत जास्त पत्र पाठविण्याचेही आवाहन केले.

राष्ट्र प्रथम या भाजपाच्या व्हिजनला ध्यानात ठेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने देशासाठी काम करावे, भाजपाच भटक्या विमुक्त समाजाला न्याय देऊ शकतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कैकाडी समाजाचा पहिला आमदार भाजपने केला आहे, येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अंत्योदय घटकांपर्यंत पोहचवा तसेच धन्यवाद मोदीजी या उपक्रमात सहभागी होत लाभार्थ्यांमार्फत पत्र पाठविण्याचे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.

यावेळी आमदार गोपीचंदजी पडळकर, प्रदेश प्रवक्ते गणेशजी हाके, प्रदेश सहसंयोजक अशोकजी चोरमले, गोविंदा गुंजाळकर, राजुभाऊ साळुंके, शिवाजी आव्हाड, देविदास राठोड, महिला मोर्चा संयोजिका सौ. उज्वलाताई हाके, युवा मोर्चा संयोजक ,अमोल गायकवाड, मुंबई अध्यक्ष आनंद कुऱ्हाडे, सौ.रश्मी जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.