संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं