एस के एच मेडिकल महाविद्यालयाचा अभ्यास दौरा संपन्न.
बीड (प्रतिनिधी) सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत फार्मसी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अभ्यास दौरा व शैक्षणिक सहल फार्माकोपीया,गाजियाबाद,नोएडा दिल्ली व भार्गव फायटो लॅब, भिवाडी येथे दि १० ऑक्टो.ते १६ ऑक्टो पर्यंत महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. अरुण भस्मे,प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल,उपप्रचार्य डॉ.गणेश पांगारकर यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी सहलीचे मुख्य संयोजक होमिओपॅथीक फार्मसी विभाग प्रमुख डॉ.शेख आतिक म्हणाले की,होम.फार्मसी विभागाच्या वतीने बी एच एम एस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व अभ्यास दौरा दरवर्षी नियमित दिल्ली येथील फार्माकोपिया गाझियाबाद,नोएडा दिल्ली,भार्गव फायटो लॅब व आयुष मंत्रालय येथील रिसर्च संशोधन केंद्रांना भेटी दिल्या जातात.या भेटीमुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येथील संस्थांमधून नवनवीन संशोधन बाबतही विपुल प्रमाणात माहिती मिळत असते.अशा सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही अधिकाधिक भर पडून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व तणावमुक्त अभ्यास दौरा यशस्वी होण्यास मदत होत असते.अशी माहिती डॉ शेख आतिक यांनी दिली.
या सहलीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून फार्मसी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शेख आतिक,डॉ.सुहास जोशी डॉ. अंजली पांगारकर,डॉ. गणेश पटकूटवार डॉ.वैभव शहापुरे,सौ. सुनीता सतकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या सहलीमध्ये प्रेक्षणीय स्थळांमध्ये कुतुब मिनार ताजमहाल इंदिरा गांधी मेमोरियल दिल्ली गेट फतेपुर मथुरा लोटस टेम्पल जामा मस्जिद इत्यादी ठिकाणी भेटी देण्यात आल्या या सहलीमध्ये महाविद्यालयातील बी एच एम एस प्रथम वर्षातील एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.