पाथरी(प्रतिनिधी)गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेज आर्ट कॉमर्स अँड सायन्स ता.पाथरी जि. परभणी या शाळा व कॉलेज चे १८ आक्टोबंर २०२२ मंगळवार रोजी गटनेता जुनैद दुर्राणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी भव्य दिव्य आतिश बाजी करण्यात आली. कार्यक्रमास शहरी भागातील पालकांनसह मोठ्या प्रमाणात गंगामसला,बाबुलतार,रेणापूर,,पोहटाकळी,खेर्डा,देवणांद्रा ,खेडूळा,बाभळगाव,नामदेवनगर,माळीवाडा,,अश्या ग्रामीण भागातून ही पालक वर्ग उपस्थित होते,सदरील कार्यक्रमात पालकांनी आपल्या चिमुकल्यान सोबत दिवाळी आकाश दिवे लावत दिवाळी साजरा केली,,
सर्व मान्यवर व पालकांनी शाळा व कॉलेज ची स्थापना करून विद्यार्थ्यांना 1 ली ते 12 वी पर्यंत चे शिक्षण व्यवस्था करून पालकांना चिंतामुक्त केल्याबद्दल शेख सलीम सर व श्री राम घटे सर ,, यांचे सत्कार व कौतुक केले, भैय्यासाहेबांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले व शाळेला लवकरात लवकर जागा निर्माण करून देऊ,, व सदरील शाळा मोठ्या प्रमाणात दर्जेदार शिक्षण देऊन,,एका उत्कृष्ट इमारतीत बांधणी करून आपण शिक्षणाचा प्रसार करावा त्यासाठी तुम्हाला हवी ती मदत मी करायला तयार आहे असं वचन भैय्या साहेब दुर्राणी यांनी दिले..कार्यक्रमा नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा स्वाद घेतला व
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. जुनेद भैया दुर्राणी साहेब,प्रमुख पाहुणे मा. नारायणजी हारकळ साहेब (आप्पा).विशेष उपस्थिती पंचायत समिती माजी सभापती सदाशिवजी थोरात साहेब,आ.राम घटे सर,नगर सेवक इजास खान साहेब,नगर सेवक कलिम भाई अन्सारी साहेब,नगरसेवक अलोक भैया चौधरी साहेब,नगर सेवक मुक्तार अलीखान साहेब,मुस्ताक खान दुर्राणी भैया,भारत जी धनले सर,माझी नगर सेवक विठ्ठलरावजी साळवे साहेब, शेख अझीम भाई,अहेमद अन्सारी सहाब,अझहर शेख हदगावकर, शकील अन्सारी,अनिल गालफाडे .. व सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयजी भिसे सर यांनी केले व आभार शाळेचे अध्यक्ष शेख सलीम सर यांनी मांडले ...