खेड : तालुक्यातील कशेडी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महाडवरून लोटे औद्योगीक वसाहतीत दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक कशेडी घाट उतरत असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक काळकाई मंदिराजवळ पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक बचावला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
 
  
  
  
   
   
  