औरंगाबाद : पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. माझ्या दाढीला हात का लावला यावरून दोन्ही मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर काही तासाच्या आत आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल उर्फ सांडु कम्मा शेख (वय-35 वर्ष रा.पिंपळवाडी पिराची ता.पैठण) आणि रामेर उर्फ राम गजेसिंग बोत (वय-38 वर्ष रा. साखर कारखाना कॉलनी एमआयडीसी ता. पैठण) दोघेही मित्र आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघेही पैठण-औंरगाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी गेले होते. मात्र याचवेळी राम बोत याच्या दाढीला मयत सांडु शेख याने हात लावला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'ती' गोष्ट अन् आमदार शहाजीबापू पाटलांनी सगळंच सांगून टाकलं Shahaji Bapu Patil on Vidhan Sabha
'ती' गोष्ट अन् आमदार शहाजीबापू पाटलांनी सगळंच सांगून टाकलं Shahaji Bapu Patil on Vidhan Sabha
आडस जिल्हा परिषद शाळेसमोर धरणे आंदोलन
केज तालुक्यातल्या आडस गावातील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक कार्यकत्या सविताताई आकुसकर यांचे आमरण...
'हमें पीटा जाता...अंग काटे जाते', गाजा के अल-शिफा अस्पताल के डायरेक्टर ने इजरायली सेना की बर्बरता की सुनाई कहानी
इजराइल ने गाजा के अल-शिफा अस्पताल के निदेशक मोहम्मद अबू सेलमिया को रिहा कर दिया है। निदेशक...
વલસાડ રસ્તાઓ : વાહન ચાલકોને ઉટની સવારી સાથે ચાંદ ઉપરની યાત્રાની અનુભૂતિ
વલસાડ રસ્તાઓ : વાહન ચાલકોને ઉટની સવારી સાથે ચાંદ ઉપરની યાત્રાની અનુભૂતિ