नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत डिफेन्स रेसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (भारत सरकार ) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये शिबिर संपन्न झाले. स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन येत्या 15 ऑगस्ट ला देशभर आनंदाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून आनंद व्यक्त करण्याचं आवाहन सर्व भारतीयांना भारत सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम , देशनिष्ठा जागृत व्हावी या उद्देशाने राकेश वर्मा वैज्ञानिक डी. आणि सहाय्यक संचालक डी. आर. डी. ओ. यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वर्मा यांनी क्षेपणास्त्र, भारतीय सुरक्षा व्यवस्था, मिसाईल, वैज्ञानिक बनण्याचे मार्ग इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. डी आर डी ओ च्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या शिबिराप्रसंगी
राकेश वर्मा वैज्ञानिक डी आणि सहाय्यक संचालक, सुश्री रेणू गिल तांत्रिक अधिकारी सी. प्रमुख, सुरक्षा, एसजी उके तांत्रिक अधिकारी B. O I/C. सबस्केल प्रक्रिया, अनिल कुमार महाजन तांत्रिक अधिकारी बी. प्रभारी ट्रिमिंग सुविधा इत्यादी अधिकारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी या सर्वांचा औषधी वनस्पतींची रोपे देऊन सन्मान केला. कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.