जिंतूर--तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे नुकतीच शालेय समितीच्या निवडी जाहीर झाल्या. या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी समाधन रामराव राठोड यांची निवड करण्यात आली. या निवडीचे गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे. या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे कैलास आश्रुबा वाव्हळे,उपाध्यक्ष प्रमोशन किशन खताळ,तर सदस्य म्हणून अशोक वाव्हळे,सविता राठोड, जयश्री राठोड,अशामती देवराव वाव्हळे, आदींचा समावेश आहे. यावेळी केंद्रप्रमुख साबळे मुख्याध्यापक वाघमोडे,पालवे सह गावातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे त्यांचे गावातील नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून शालेय शिक्षण समितीची निवडणूक झाली नव्हती.