चिपळूण : राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्य राजीनाम्यावरून चर्चा सुरू झाली आहे. अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध् अंतर्गत धुसफूस असल्याचे बोलल जाते.

योगेश शिर्के तालुक्यातील चिवेली गाव रहिवासी व सरपंच, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी राजीनामा नेमका कोणत्या कारणाने दिला, याबाबत पक्षांतर्गत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिर्के यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे पक्षांतर्गत गोटातून सांगितले जाते.

पक्षातील नव्यांना संधी मिळावी व आपण पुरेस वेळ देऊ शकत नसल्याने शिर्के यांनी राजीनामा दिल्याचे‍ बोलले जाते. शिर्के यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी युवक संघटनेतील काही इच्छुकांकडून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे..

चिपळूण, लांजा, गुहागर या तालुक्यातील युवक काही पदाधिकारी जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांपर्यंत संपर्क करू लागले आहेत. एकूण जिल्हाध्यक्षपदासाठी शिर्के यांच्या राजीनाम्यानंत युवक संघटनेत जोरदार चढाओढ सुरू झाली आहे.