औरंगाबाद:- दि. ९ आक्टों.(दीपक परेराव)शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवल गेल परंतु उद्धव ठाकरे हेच नाव आमच्यासाठी काफी आहे असे विरोधी पक्षा नेता अंबादास दानवे यांनी पञकारांशी संवाद साधताना ठणकावून सांगितले.

आज आयोजित पञकार परिषदेत बोलत होते.धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असा अयोगाचा निर्णय असून ही यंञणा कोणच्या तरी दबावाखाली काम करतेय अस वाटतंय,शिंदे गटासाठी हा अट्टाहास होता का?हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसांसाठी पक्षाची स्थापना केली आहे,भाजपचा हा कुटील डाव असून,उद्धव ठाकरे हे नेतृत्व देशपातळीवर निर्माण झाले आहे,हे बघवत नाही,गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला आहे.

शिवसेना यापुढे मोठ्या धडाडीने,जोमाने काम करणार आहे,धनुष्यबाण हे सामान्य माणसांची अस्मिता होती,ईडीची यंञणा थांबली आहे परंतु तांञिकदृष्ट्या शिवसेनेच्या पाठीमागे लागलेली आहे,आमदार,खासदार ही शिवसेना नाही, प्राथमिक सदस्य,जनता हीच खरी शिवसेना आहे.

अंधेरीच्या पोटनिवडणूकीत विजयाचा संकल्प शिवसेनेचा असल्यामुळे जनतेचा कौल उद्धव ठाकरे सोबत असून ते जनतेचे हीत साधणारे नेतृत्व आहेत.

कशा पद्धतीने निर्णय झाला असावा यावर शंका व्यक्त होत असल्याचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे पञकारांशी बोलताना सांगितले.