भीमाशंकरकडून  सन २०२१-२२ हंगामासाठी अंतिम ऊस दर रु. २८००/- प्रती मेट्रीक टन जाहीर 

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम ऊस दर रु.२८००/- प्रती मेट्रीक टन जाहीर केला असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली. 

मा.आ.श्री. वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२१-२२ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११,८६,४२६ मेट्रीक टनासाठी कारखान्याने यापुर्वी एफ.आर.पी. नुसार रु. २६४२/- प्रती मेट्रीक टनाप्रमाणे होणारी रक्कम एकरक्कमी ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. उर्वरित अंतिम हप्ता रु. १५८/- प्रती मेट्रीक टनामधून भीमाशंकर शिक्षण संस्था निधी रु. ८/- प्रती मेट्रीक टन वजा जाता रु. १५०/- प्रती मेट्रीक टनाप्रमाणे होणारी रक्कम रु. १७ कोटी ८० लाख ऊस उत्पादकांचे बँक खात्यावर दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत तसेच बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत डिस्टीलरी प्रकल्प नसतानाही चांगला ऊस दर दिल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

 कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय एफ.आर.पी. पेक्षा जास्त रक्कम अंतिम हप्त्याचे स्वरुपात शेतक-यांना अदा करण्याचे निश्चित केले आहे. गाळप हंगाम २०२२-२३ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन श्री. बेंडे यांनी केले.