रत्नागिरी : परतीचा पाऊस पाठ सोडत नसून तालुक्यात मागील दहा-बारा दिवसांपासून पाऊस सक्रीय आहे. रत्नागिरी व परिसरात सोमवारी (दि. १८) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारापासून धो धो पाऊस बरसत आहे. हृदयाचा ठोका बंद पाडणारा विजांचा प्रचंड कडकडाटात पावसाने हजेरी लावल्याने घराबाहेर अथवा बाजारात असणाऱ्या नागरिकांची व व्यवसायिकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आनंददायी, मंगलमय दिवाळी सण तोंडावर आला असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे भात पीक काढणीस आले आहे, तर काहींनी शेतात कापून ठेवले आहे, परंतु मागील पंधरवड्यापासून अधून-मधून पिकांवर पावसाची वक्रदृष्टी सुरूच आहे. त्यामुळे भात शेती कापणीला अडथळा होत असल्याने शेतकरी प्रचंड धास्तावला आहे.
शेतात पाणीच पाणी साचत असल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीतच सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेले पीक हातचे जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
हातखंबा परिसरात ढगांच्या गडगडाटसह तुफान पाऊस
हातखंबा आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. या पावसानं अनेक रस्ते जलमय झाले. शेतात पाणी साचल्यानं शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अचानक आलेल्या पावसानं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.