परभणी(प्रतीनीधी)पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.मोहन फड यांनी मागील अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेचे पवित्र व्रत जोपासले आहे. याच सेवेतून त्यांनी अनेक रुग्णांना नवीन आयुष्य तसेच नवीन दृष्टी दिली आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील उद्धव गवळी यांची मुलगी दिव्या उद्धव गवळी (वय 15 वर्ष) हिच्या हृदयाला जन्मजात छिद्र होते. तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. ही गोष्ट उद्धव गवळी यांनी संकल्प फाउंडेशन चे सदस्य बाबा शेख यांच्या कडे बोलून दाखवली बाबा शेख यांनी पुढाकार घेऊन मा.आ. मोहन फड यांना या बाबत माहिती दिली.
मा.आ.मोहन फड यांनी मतदार संघातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी व्रत हाती घेतले आहे. याच व्रतातून मोहन फड यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयातील डॉ.आशुतोष सिंग यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. दिव्याच्या आई व वडिलांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकक्ष प्रमुख आदरणीय मंगेश चिवटे , ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉ.आशुतोष सिंग सरांचे आभार मानले .या कार्यासाठी, पप्पू नखाते व बाबा शेख या आरोग्यमित्रांनी साथ लाभली.