बीड ( प्रतिनिधी) गेल्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरूर, गेवराई, बीड, पाटोदा, माजलगाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे सोयाबीन आणि कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे राज्य सरकारने व शासनाने पंचनामे व इतर निकष न लावता शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी या आसमानी व सुलतानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे व या शेतकऱ्यांची ही दिवाळी गोड करावी जर राज्य सरकारने व शासनाने दिवाळीच्या अगोदर परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही केली तर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्यामध्ये दिवाळीच्या दिवशीच धरणे आंदोलन असा इशारा दिला आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे जिल्ह्याचे महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर जिल्हा सहसचिव गोटू वीर, अजय सरवदे महिला जिल्हाध्यक्ष चक्रेताई बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे, गणेश वीर, बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड, राजकुमार जोगदंड, सचिन , मेघडंबर, राजेंद्र कोरडे, उमेश तुळवे आदी उपस्थित होते