बीड : शहरातील सराफा व्यापारी गणेश मैड यांच्या दुकानावरील नोकराने रोख रकमेसह बुलेट घेऊन पळ काढल्याने खळबळ उडाली आहे . तीन लाख 25 हजार रुपयांसह बुलेट गाडी घेऊन पसार झालेल्या करणं मुंडे याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . शहरातील माळीवेस भागात गणेश मैड यांचे कैलास ज्वेलर्स नावाचे दुकान आहे . त्यांच्या दुकानात तीन आठवडण्यापूर्वी करन मुंडे हा युवक नोकरीस लागला होता . मंगळवारी मैड यांनी शाळेतील आणि दुकानातील मिळून तब्बल तीन लाख 25 हजार रुपये रक्कम बँकेत भरण्यासाठी करन कडे दिली . बँकेत जाण्यासाठी त्याला स्वतःची बुलेट देखील दिली . मात्र तासाभराचा कालावधी उलटला तरी करन परतून न आल्याने मैड यांनी बँकेत चौकशी केली . तेव्हा बँकेत पैसे जमा झाले नसल्याचे कळले . त्यानंतर त्यांनी करनच्या गावाकडे जाऊन चौकशी केली मात्र तो तेथेही नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं