संभाजीनगर : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबूल लाईव्ह करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे . त्यामुळे खळबळ उडाली असून नेमके त्यांनी हे फेसबूक लाईव्ह कुठून केले , याचा शोध आता पोलिस घेत आहेत . आपण समाजाला कधीही विकले नाही . मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली . ही बदनामी असह्य झाल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रमेश केरे यांनी म्हटले आहे . रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले आहे की , मला माफ करा . सर्व बांधवांना हा माझा शेवटचा जय शिवराय . मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे , विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले . मात्र , सोशल मीडियात माझी ऑडिओ क्लिप फिरवून माझी बदनामी केली जात आहे .