7 दिवसापासून कॅनल मध्ये आंदोलन सुरू
सोलापूर : - पाटकूल येथील आष्टी उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या मात्र अद्याप मोबदला दिला नाही.तसेच कॅनालच्या आतील दोन्ही बाजूस प्लास्टर नसल्याने मोठी भगदाड पडलेला आहे. अशा विविध मागण्याघेत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या 7 दिवसापासून कॅनल मध्ये आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांनी ऊन ,पाऊस ,वारा याची तमा न बाळगता हे आंदोलन धग कायम ठेवली आहे.