बीड प्रतिनिधी

कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022-23 साठी यापूर्वी तसेच 30 नोव्हेंबर 2023 पर्यन्त अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbtmahit.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. या योजनेमध्ये 16 स्थानिक फळपिकांच्या लाभ 100 % अनुदानावर घेता येणार आहे.

योजनेसाठी लाभार्थी पात्रता.

1. मग्रारोहियो सोजनेसाठी जे लाभार्थी पात्र ठरु शकत नाहीत असे लाभार्थी,

2. या योजनेचा शेतकऱ्यांना वैयक्तीक लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना नाही

3. यापूर्वी महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधुन सर्वसाधारण, अनु.जा. अनु. जमाती महीला

व दिव्यांग व्याक्ती यांची निवड करण्यात येईल.

3. शेतकऱ्यांना किमान 0.20 हे. ते कमाल 6 हे. क्षेत्रावर फळबागेचां लाभ घेता येईल.

 सदर योजनेच्या अधिक माहीतीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा गावच्या कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री बी. आर. गंडे यांनी केले आहे.