शिक्षकांची सहृदयता; विद्यार्थ्यांना फराळ वाटप करून केली दिवाळी साजरी....   

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

               

 बिडकीन प्रतिनिधी -

बिडकिन येथिल किलबिल प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना फराळ वाटप करून यावर्षीचा दिपोत्सव आनंदात साजरा केला कोजागरी पौर्णिमा झाली की, वातावरणात गारवा निर्माण होतो आणि वेध लागतात दिवाळीचे. दिवाळी या सणाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. खास करून लहान मुले अगदी उत्साहात दिवाळी साजरी करतात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबातील विद्यार्थी मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी किलबिल प्राथमिक शाळेने दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदमय बनली आहे.  या सणाचा प्रत्येक विद्यार्थ्यांना आनंद घेता यावा यासाठी फराळ मेजवाणीचे वाटप करण्यात आले. शिक्षक बांधवांनी ज्ञान दानाबरोबरच समाजाचं काही तरी देणे लागते म्हणून केलेले फराळ वाटपाचे कार्य व केलेली मदत कौतुकास्पद आहे.शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एक प्रकारे ऊर्जा निर्माण करत असते या हेतूने शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांसोबत यंदाची दिवाळी साजरी करून माणुसकीचे उत्तम दर्शन घडविले आहे.दिवाळीचा सण गरीब कुंटूंबात साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने किलबिल परिवार यांनी हा दिवाळी फराळ वाटपाचा हा विशेष उपक्रम राबवला आहे. याप्रंसगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला आणि विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या कुंटूबातील दिवाळी यावर आपले विचार मांडले. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना फराळ वाटण्यात आला, सगळ्यांनी त्याचा मनमुराद आस्वाद घेतला. शाळेने पहिल्यांदाच दिवाळी विशेष उपक्रम राबवला होता. किलबिल प्राथमिक शाळेच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचा एक भाग म्हणून यंदाच्या दिवाळीला फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मुख्यध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

रविंद्र गायकवाड, बिडकिन