औरंगाबाद : आरएसएसचे सूर बदलले आहेत. ते तुमची मते लुटू इच्छित आहेत. त्यांच्या बहकाव्यात येऊ नका. तुमची एक मोठी ताकद आहे. ती ओळखा आणि दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशोखर आजाद यांनी शुक्रवारी येथे केले.तापडिया नाट्य मंदिरात आयोजित आजाद संवाद मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र ही क्रांती भूमी आहे. मी महाराष्ट्रात येऊन नवीन विचार व प्रेरणा घेऊन जातो. देशभर फिरून त्याच प्रेरणेतून मी काम करीत असतो.पण महाराष्ट्रातले नेते एकत्रित नाहीत. ते विखुरलेले आहेत, भावी पिढ्यांच्या दृष्टीने ही गोष्ट योग्य नाही, अशी खंत आजाद यांनी व्यक्त केली.भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे,याबद्दलची चीड व्यक्त केली. साप हा चावतच असतो. त्यामुळे आरएसएस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बांधील राहील, असे समजणे चूक ठरेल, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, या देशाचे शासक बनू, हा विचारच आपण स्वीकारत नाही. राजकारण वाईट असते तर मग तेया लोकांनी का केले असते. आपण संकुचित विचार सोडून देऊन महापुरुषांच्या विचारधारेने चालले पाहिजे.त्यांच्या विचारांची हत्या होऊ देता कामा नये. अत्त दीप भव बना. अण्णाभाऊ साठे म्हणाले, ये आझादी झूठीहै, देश की जनता भूखी है, हे आजही खरे आहे. ज्यांची सामाजिक पाळेमुळे रुजलेली आहेत, त्यांना नमागता सर्व काही मिळते. अलीकडेच सर्वांना मिळालेले दहा टक्के आरक्षण हे त्याचे उदाहरण होय. हेआरक्षण संविधानविरोधी असल्याचा आरोप आजाद यांनी यावेळी केला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शिरूर तालुक्यातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग
शिरूर तालुक्यातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
शिरूर...
বল বম যাত্ৰা, বালিপৰাত নিশা মহাদেৱৰ বন্দনাৰে মুখৰিত জীয়াভৰলী নদীৰ পাৰ
আজি শাওন মাহৰ তৃতীয়টো সোমবাৰ। হিন্দু ধৰ্মীৰ আৰাধ্য দেৱতা শিৱৰ আৰাধনাৰ মাহ। শাওনৰ প্ৰতিটো সোমবাৰে...
ৰহা মঠৰবৰীত ১২০তম্ শ্ৰীকৃষ্ণ দৌল ম মহোৎসৱ সম্পন্ন।
হৰিনামেৰে মুখৰিত মঠৰবৰী থান
ৰহা নিকটবৰ্তী বাৰহপূজীয়া সাৰ্বজনীন মঠৰবৰী থানত ৬মাৰ্চৰ পৰা ৬দিনীয়া কাৰ্য্যসূচীৰে আৰম্ভ হোবা...
AAP govt. hand-in-glove with gangsters : Chugh
BJP national general secretary Tarun Chugh today lambasted the Bhagwant Mann government in Punjab...