पालम प्रतिनिधी
पालम येथील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पालम तालुका अध्यक्षपदी फळा येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोकराव
बालासाहेब पौळ यांची निवड 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता नियुक्ती पत्र देऊन करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या आदेशानुसार राज्य सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केलेली आहे. परभणी येथे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा कार्यालयामध्ये 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पक्ष विस्तार व संघटन बांधणी करण्यासाठी यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेले आहेत. पालम तालुका अध्यक्षपदी अशोकराव पौळ यांची निवड पक्षाने केलेली आहे. यावेळी परभणी जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी खासदार सुरेश जाधव,सह संपर्कप्रमुख भास्कर लंगोटे, जिल्हाध्यक्ष माधव कदम, विधानसभा प्रमुख चंद्रकांत सुर्यवंशी, मारोती शिंदे, सोपान कराळे, नामदेव पौळ आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.