पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्याला जोडणारा येवलवाडी मधील अतिशय महत्त्वाचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असून ह्या रस्त्याचे अगोदर काम झाले परंतु या रस्त्यावर मोठा खडा पडला असून ह्या रस्त्यावर पुल नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे दळणवळणासाठी येवलवाडी कराना खुप अडचणीचा सामना करावा लागतात आहेत. पावसाळयात रस्ता खराब असल्याने वाहने चालवता यत नाहीत तसेच शेतकऱ्यांना शेतातुन निघणार्याला मालाला ने-आण करण्यासाठी खराब स्वरुपाचा रस्ता असल्या कारणाने शेतकऱ्यांना नाहक ञास सहन करावा लागत असल्यामुळे शेतात काम करत असताना काही दुर्घटना झाल्यास वाहतुक करता येत नसल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो ह्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जि.प बांधकाम विभागाचा रस्त्यावर पुल झाल्यावर त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होणार असल्याने विकास प्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांनी लक्ष घातल्यास ह्या रस्त्यावर पुल होईल व या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असल्यामुळे युवानेते किशोर नागरगोजे यांनी केली आहे