हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे कापुन टाकलेल्या सोयाबीनला कोंब आले असुन शेतकरी संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन निराश झालेल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरे सहीत आमचं गाव विकत घ्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शासन शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या विवीध योजना राबविल्या जातात तरी याच नानाजी देशमुख यांच्या जन्मभुमीतील गारखेडा येथील गावकऱ्यांना गाव विक्रीला काढण्याची पाळी आली आहे.यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.