बीड (प्रतिनिधी) मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन ल.पा बीड येथील प्रकरणात भूसंपादन मावेजांमधील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करिता तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी बीड यांचे समक्ष 8 ते 9 सुनावण्या झाल्या सदर सुनावणी दरम्यान संचिका क्र.08/2008,गाव तलाव क्र.5,मेंगडेवाडी ता.पाटोदा जि. बीड, संचिका क्र.45/2007 पाझर तलाव क्र.10 मौजे वडझरी,ता.पाटोदा जि. बीड, संचिका क्र.50/2007, गाव तलाव क्र.6, वडझरी ता.पाटोदा जि. बीड सह 2 संचिका गायब असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. मा.जिल्हाधिकारी बीड यांना सदर संचिका गायब प्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन ल.पा बीड यांनी सदर संचिकेची कार्यालयात शोध घेण्यासाठी 25 फेब्रुवारी 2021 रोजी श्री.शेख ए.एम.अ.का, श्री. पी. एन. बागडे लिपिक, श्री.पुराणिक एस.एम मंडळ अधिकारी, श्री.धांडे के.एल. शिपाई, श्री आर.डी. चांदणे शिपाई व श्री व्ही.डी. बडे कंत्राटी डाटा ऑपरेटर यांची नियुक्ती केल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे.
सदर प्रकरणी 15 महिने लोटले त्यानंतर 2 संचिका सापडल्या परंतु 3 संचिका सापडत नसल्याचे दिसून येत आहे. करिता भूसंपादन प्रकरणी संचिका गहाळ केल्याने तत्कालीन पेशकार/लिपिक श्रीनिवास मुळे यांचेवर शासन नियमानुसार गुन्हे दाखल करावेत अथवा सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 9 अन्वये शास्ती लावण्यात यावे अशी मागणी उपलाजिल्हाधिकारी भूसंपादन ल.पा. बीड मच्छिंद्र सुकटे यांचेकडे केली असता गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत.
विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना भेटून संचिका गायब करणारे मुळे यांचेवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वंचितचे अजय सरवदे यांनी केली आहे.