जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 15 ऑक्टोंबर शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजता घडली.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 मिळालेल्या माहितीनुसार कौसडी येथील रहिवासी गुलाब भगवानराव जीवने वय वर्ष 24 या तरुण शेतकऱ्यांनी फायनान्सच्या कर्जाला कंटाळून व हातात आलेले सोयाबीन पीक पावसामुळे वाया गेल्याने त्रस्त होऊन स्वतच्या शेत आखाड्यावर दिनांक 15 ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान फवारणी करण्याचे विषारी औषध सेवन केले. ही माहिती कळताच नागरिकांनी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील दाखल केले परंतु विष अंगात जास्त प्रमाणात पसरल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी परभणी येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. उपस्थित नागरिकांनी विलंब न करता जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर उपचार यादरम्यान रात्री नऊ वाजता गुलाब जीवने या तरुण शेतकऱ्यांचे प्राणज्योत मावळली.

 गुलाब जिवाने यांच्या वडिलांचा काही दिवसापूर्वीच सर्प दंश ने मृत्यू झाला होता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी गुलाब जीवने यांच्यावर आली होती. कुटुंबाचा गाळा ढकलत फायनान्स चे कर्ज कसे फेडावे व हातात आलेले सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेल्यामुळे या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब सध्या उघड्यावर आले असून कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी होत आहेत. गुलाब जीवने यांचा अंतिम संस्कार दिनांक 16 ऑक्टोंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शेजारील स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या या आत्महत्यामुळे गावभरात शोककळा पसरली